6 dec17 3 - nil41/gck GitHub Wiki
Hello, Sorry, I am messaging you for the second time. पण मला तुला taras देण्याचा कोणताच हेतू नाहीये. तुझा निर्णय आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला त्या बद्दल आदर हि आहे. शेवटी पसंती नापसंती या गोष्टी arrange marriage ठरवताना होत असतातच. पण मला असे वाटतेय कि माझ्या बद्दल तुला काही गैर समाज झालेले असतील तर being professional मला काही मुद्दे इथे clear करायचे आहेत.
-
मी तुला का पसंद केले.
-
मी काही questions ना का answers देऊ शकलो नाही.
-
माझे तुझ्या parents च्या responsbiities sharing बद्दल काय मत आहे.
-
miss communication.
तुला कदाचित असे वाटत असेल कि मी तुझ्याशी महत्वाच्या मुद्द्यांवर जसे carriur , future plans, responsibilities अश्या गोष्टी वर discussion न करताच तसेच तुझे विचार न ऐकताच, पहिल्या भेटीतच असे कसे काय "पसंद" आहे असे म्हणालो. किंवा मी तिला त्या वेळी तिकडे कोणतीही तयारी न करताच असाच आलेलो होतो असे वाटले असेल. तर मला जशी life partener हवी होती तशीच तू आहेस (मला माझ्या पेक्ष्या हुशार , family बद्दल ओढा असलेली , independent, self respect असणारी , responsbilities आणि विचार share करणारी life partner हवी आहे, आणि तिला कोणतेही decision घेण्याचे स्वातंत्र्य असेल. आणि मी तुला हे सांगू शकलो शकलो नव्हतो). आमच्या घरी माझी आणि तुझ्या parents ची पहिली भेट झालेली होती त्यावेळी त्यांनी आम्हाला तुझ्या बद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या सर्व माझ्या अपेक्षे प्रमाणे होत्या त्यामुळे माझ्या वर तुझे भरपूर impression पडलेले होते तसेच माझे पप्पा आणि तुझे पप्पा हे लहान पानापासूनचे दोस्त आहेत त्यामुळे तुला भेटण्याच्या अगोदर पासून माझा आणि माझ्या family चा तुमच्या साठी +ve approach होता. पण कदाचित पहिल्या पासूनच +ve approach असल्याने माझ्यावर तुमच्या flat आणि salary चे थोडे pressure होते. मी असे ऐकून होतो कि आजकाल मुलींना well setteled मुलगा लागतो (पण मला वाटते कि त्या पेक्ष्या हि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोघांचे विचार जुळले पाहिजेत. त्यांना एकमेकांना समजून घेता आले पाहिजे). तुझ्या मम्मी नी मला माझे package पण विचारले होते (मुलीची आई म्हणून हे विचारणे बरोबरच आहे). त्या मुळे मलासुद्धा असे वाटले होते कि तू सुद्धा मला ह्या बद्दलच काहीतरी प्रश्न विचारशील पण तू शेवट पर्यंत या बद्दल स्वतः काहीच विचारले नाहीस, या बद्दल thanks. पण मी उगाचच या मुळे pressure मध्ये गेलो होतो. मी तुझ्या कडे येताना भरपूर तयारीने आलो होतो (म्हणूनच मी तुला bio data मध्ये passionate about traveling लिहलेले आहे हे विचारले होते) तुझ्या बद्दल माझ्या कडे तुझ्या parents नी दिलेली बऱ्या पैकी माहिती होती. मला तुज्याशी खूप गोष्टी discuss करायच्या होत्या . जेवढ्या शक्य होईल तेवढ्या त्या वेळी आणि राहिलेल्या बाकीच्या भेटी मध्ये, कारण मला तुझ्या बद्दल माहिती होती, पण तुलाही मी कसा आहे हे समजलो पाहिजे आणि त्या नंतरच तुझ्या निर्णय बद्दल मला विचारायचे होते. पण त्या दिवशी सगळ्या गोष्टी ठरवलेल्या पेक्ष्या काहीतरी वेगळ्याच पद्धतीने घडल्या.
मी nurvous झालो दोन गोष्टी मुळे
-
reason वर लिहलेला आहे आणि 2. तुम्हाला कशी बायको पाहिजे याचे उत्तर मला देता आले नाही. तू मला सुरवातीलाच हा question विचारलास and this was expected question आणि मी त्याचे उत्तर हे देणारच होतो त्याच वेळी तू हसून म्हणाली होतीस कि "मला बायको म्हणताना हसू येतय" मला वाटले कि तू सुद्धा nurvous होतियेस, म्हणून मी तुला comfort feel करण्यासाठीच म्हणालो होतो कि, माझा पण दुसराच कार्यक्रम आहे. पण तू लगेचच मला दुसरा question विचारास होतास कि “तिथे काय झाले ?” आणि हा question मी expect केला नव्हता, आणि मी तुला आपल्या पहिल्याच भेटी मध्ये कसे सांगू शकतो कि “तिथे काय झालेले होते” तर तो topic avoid करण्यासाठी मी विचार न करताच म्हणालो होतो कि “मी तिकडे सहजच गेलो होतो family बरोबर.” (मी तिथे सहज गेलो नव्हतो) आणि मी हे काय बोललो, ह्याचा विचार करत होतोच तो पर्यंत तू दुसरा cross question विचारलास. “तुम्ही इथे पण family force मुळे आलात काय ?” मी अक्षरशः shock झालो होतो. मला माहिती आहे कि तू हा question मुद्दामहून विचारलेला नव्हतास. जर मला सुद्धा असे कोणी उत्तर दिले असते तर मी सुद्धा हाच question विचारला असता. पण त्या मुळे मला त्या प्रश्नाचे उत्तरच देता आले नाही. त्या वेळी अजून pressure मध्ये गेलो कि मला ह्या commmon प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही, तुझ्यावर माझे काय impression पडले असणार. मी तिथेच ठरवले होते की, त्या दिवसा साठी तुझ्याशी फक्त बाकीच्या गोष्टी बोलून घ्यायच्या. म्हणून मी आमच्या फॅमिली आणि इतर topics सुरु केले. पण तुला मी nurvous झालो होतो हे जाणवलेले नसेल. त्या मुळे तुझे questions सुरु होते. आणि मला कोणत्याही topic वर मनमोकळे पणाने बोलता आले नाही. आणि त्या मुळे माझे विचार तुला कळालेलेच नाहीत.
सगळ्यात शेवटी मी तुला तू एकटी आहेस तर तुझे expectations काय आहेत? हा question विचारलेला होता. मला फक्त त्या दिवशी तुला जाणवून द्यायचे होते कि तुझ्या साठी हा imp topic आहे आणि हे मला माहिती आहे. आणि त्या बद्दल तुझ्याशी दुसऱ्या भेटी मध्ये बोलायचे. मी त्या वेळी "हो हे करायलाच हवे" एवढेच बोललो होतो(याचा अर्थ तू म्हणशील तसे होईल असा होता पण मी त्या वेळी हे express करू शकलो नाही), कारण शेवटी शेवटी मला काय बोलायचे हे कळत नव्हते. त्यातच तुला काहीतरी विचित्र सांगितले होते, कि retairment नंतर business कि असाच काहीतरी माझ्या मना मध्ये असे काहीही नसताना. तर, तुझे parents आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, त्याच वेळी त्यांनी तू सांगीतलेली गोष्ट आम्हाला clear केलेली होती. त्यांनी सांगितलेले होते कि, ते शेजारी राहतील, त्यांची responsbility आणि लग्ना नंतर तुझा ओढा हा त्यांच्या कडेच जास्त राहील, आणि तुला त्यांनी खूप लाडात वाढवलेले आहे असे. आणि त्या नंतर आमच्या family चे ह्या वर discussion सुद्धा झालेले होते, कुणाला काहीही problem नाहीये. तर माझे म्हणणे असे होते की, तुझ्या parents ची responsbiliti share करायला मला आवडेल. त्यांच्या बाबतीत तू जे decisions घेशील त्याला माझा पाठिंबा असेल. ते शेजारी राहु देत किंवा तू त्यांना आपल्या घरी राहा म्हणालीस तरी चालेल. मी सुद्धा माझ्या parents ना मुलगा म्हनुन एकटाच आहे. त्यामुळे पुण्यात माझे parents जसे माझ्या समोर राहतील तसेच तुझे parents तुझ्या समोर राहतील. अश्या गोष्टीं मध्ये आपण mutual understanding दाखवायला हवे. कारण जसे माझे parents माझ्या साठी important आहेत, त्यांनी माझ्या साठी खूप काही केलेले आहे. तसेच तुझे parents तुझ्या साठी important असतीलच. ह्या point वर मला तुझ्याशी अजून खूप काही discussion करायचे होते. पण त्या वेळी मी बोलू शकलो नाही हि माझी चूक झाली, आणि आता तू ऐकायला तयार नाहीयेस.
तुमच्या इथून आम्ही निघाल्या नंतर घरी जातानाच pappa mummy ने मला विचारले होते कि तू कशी वाटली. मी त्यांना म्ह्नणालो होतो कि “तिच्या parents नि सांगीतलेली तशीच आहे, आणि पसंद आहे, पण मला तिच्याशी पुन्हा चर्चा करायची आहे असे त्यांना सांगा”. पण मी त्यांना त्या वेळी सांगितले नव्हते कि nurvous झाल्या मुळे मी तुझ्या बरोबर imp points discuss केलेले नाहीयेत. आणि तिला माझे विचारच कळले नसतील (कदाचित मी लाजलो असेल कि त्यांना हि गोष्ट कशी सांगायची). घरी चर्चा झाली, पहिल्या पासून +ve approach होता आणि मी सुद्धा पसंद आहे म्हणल्यावर निर्णय घ्यायला जास्त वेळ लागला नाही, त्या वेळी ठरले होते कि तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्यायचा आणि 3-4 दिवसांनी तुम्हाला निरोप द्यायचा , आणि त्या नांतर सगळे shopping साठी market मध्ये गेले. त्या नंतर मी हि गोष्ट माझ्या cousin ला सांगितली, आणि सगळे market मध्ये गेल्या मुळे आम्ही हे जे घडले होते ते dinner करताना सांगायचे असे ठरवले. पण त्या संध्याकाळी pappana कोणीतरी म्हणाले कि आज चांगला दिवस आहे आणि तुमचा निर्णयही जर झाला असेल तसेच आम्ही दुसऱ्या दिवशी गावीही जाणार होतो, म्हणून अचानकच 3-4 दिवसांनी तुम्हाला निरोप द्यायचा plan बदलून (त्या वेळी मी market मध्ये गेलो होतो) तुम्हाला त्यांनी निरोप दिला कि “पसंद आहे”. पण त्यांना मला तुझ्याशी चर्चा का करायची आहे याची माहितीच नव्हती. त्या मुळे त्यांनी हि गोष्ट सांगितलेलीच नाही. माझ्या पप्पांचा तुम्हाला निरोप मिळाल्या नंतर तुमच्या पप्पानी तुमचा निरोप आमच्या काकांना सांगीतला. आणि त्यांनी आम्हाला फक्त "तू अजून २ वर्ष लग्नासाठी तू तयार नाहीस" एवढेच सांगितले. तर त्या दिवशी माझ्या कडून २ गंभीर चुका घडल्या. मी तुला शेवटी सांगायला पाहिजे होते कि मी nervous झालेलो आहे आणि आपण बाकीच्या गोष्टी पुढील भेटी मध्ये बोलू. आणि तीच गोष्ट मी लगेचच घरी सांगितली नाही. पण मला असे वाटले होते कि तू शेवटी parents च्या बाबतीत बोलताना तू थोडी emotional झालेली होतीस आणि मी त्या वेळी न बोलण्याने कदाचित नाराज झालेली होतीस असे जाणवले होते. (जर असे असेल तर सॉरी ) म्हणूनच मी तुला 1st short msg मध्ये विचारलेले कि तू discussion मुळे तर नाही म्हणाली नव्हतीस ना? म्हणजेच माझे विचार तुला कळले नसतील आणि आपण पुन्हा चर्चा केली असती आणि त्या नंतरही जर तुला विचार पटले नसते तर तू पुन्हा नाही म्हणाली असतीस,मी नाराज झालो नसतो. शेवटी हा आपापल्या आयुष्याचा प्रश आहे, त्यात नाराज होण्या सारखे काय?
and special thanks to your father. मी त्यांना call केला होता कि काय झाले होते ते सांगण्यासाठी आणि ते खूप चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलले आणि i hope कि हे तुला त्यांनी सांगितले असेल. तर “Sorry मला माफ करा” त्या दिवशीच्या माझ्या तश्या वागण्या बद्दल, मला तुला नाराज करायचे नव्हते. तुझ्या parents नी पण तयारी केली होती, त्यांचा वेळ दिला होता, तर त्यांच्या साठी हि “Sorry मी माफी मागतोय" .
i hope everything is clear to you and this is last msg from my side else you will think that i am bothering you. Thanks -Nilesh
आणि तुझे pappa पण आपल्या family च्या common friend ना मी तुझ्या प्रश्नांनाही उत्तरे दिलेली नाहीत हे reason आहे असे म्हणाले होते आणि हे मला गेल्या २ week मध्ये कळाले. पण ते काहीही असेल, तुझ्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे.